अमळनेर : पोलीस वृत्त न्युज- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कमी दिवस राहिल्याने उमेदवार एकीकडे जोमाने प्रचार करत आहे. उमेदवारांचे नेमलेले मीडिया प्रमुख स्वतःला होणाऱ्या आमदाराचे पी. ए समजत मोठ्या थाटात कार्यालयात एसी ची थंडी हवा खात आहे. अजुन काय ‘ठाव ना ठीकणा’ पण जणू आजच आपला उमेदवार हा आमदार झाल्यासारखं त्याला वाटत आहे. आणि मी जणु त्याचा स्वतः पी.ए पण त्याने हेही विसरू नये. की आपण ‘ना सारामा ना पोतारामा’ ….मांजेर ना….. त्याने याचाही विचार करावा . पत्रकारांना संपादकीय भाषा शिकणारा पत्रकारिता शिकवणारा हा पत्रकारांचे हजेरी घेतो. आणि एखाद्याने जर त्याची लाल केली तर त्याची चापरशी करत फिरतो. म्हणून याचाही तळ्यातला एक पाय मळ्यात, घेतला पाहिजे. त्याला याची जाण आहे का? आपला उमेदवार सत्तेसाठी उन्हातानात दिवसभर मतासाठी गावोगावी जाऊन जनतेच्या दरापुढे हात पसरवत मातांची भीक मागत आहे. उमेदवाराचे जरी आमदारकीचे स्वप्न असले ते पूर्ण होईल की नाही त्याचं स्वप्न साकार करण्याचं काम जनता जनार्दन करेल. प्रचारात दंग असलेल्या उमेदवाराने प्रचारातून थोडा वेळ काढत जरा मागे वळून कार्यालयाकडे पाहायला हव आपण नेमलेले कर्मचारी ‘पीए’ मीडिया प्रमुख संदर्भात चालू असणाऱ्या कारभाराकडे जरा ढुंकून पाहिले पाहिजे. प्रचारादरम्यान जनतेपुढे आश्वासने देऊन आपण पुढे किती झाडू मारून सफाई केली तर मागे उठणारा धुराळा(फफुटा) आपल्याला पुन्हा दूषित तर करत नाही ना. ज्या अशा लोकांना आपण कामावर ठेवले आहे. पदे व कामे वाटून जबाबदाऱ्या सोपिल्या आहेत. त्यांचे काम कितपत पारदर्शक सुरू आहे की नाही. याची थोडी चौकशी उमेदवाराने करायला हवी. की यांच्या आचरणामुळे आपल्या बाबत लोकांमध्ये संभ्रम अथवा नाराजी तर नाही ना. भावी आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांनी अशा लोकांना ‘पीए’ व मीडिया प्रमुख म्हणून ठेवले तर, उमेदवारांचे आमदारकीचे स्वप्न देखील भंगु शकते… चहा पेक्षा केटली गरम .,…… असे चित्र दिसून येते… (संपादक – रजनीकांत पाटील)