नागपूर- (पोलीस वृत्त) बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर
(Babasaheb Ambedkar International Airport) उभे असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाशेजारी वीज पडली. यामुळे विमानाचे नुकसान झाले नाही. परंतु, विमानाची फिटनेस चाचणी करणारे दोन अभियंते जखमी झाले.

अमित आंबटकर (Amit Ambatkar) (28) ऋषी सिंग (Rishi Singh) (33) अशी जखमी झालेल्या अभियंत्यांची नावे असून त्यांच्यावर किंग्जवे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इंडिगोचे विमान नागपूरहून लखनौसाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वी, विमानाची फिटनेस तपासणी सुरू होती. आंबटकर आणि सिंग हे दोघेही त्या कामावर होते. तपासणी सुरू असताना विमानाशेजारी वीज पडल्याचा प्रकार घडला.(There was a lightning strike near the plane.)
या घटनेत जखमी झालेल्या दोघांनाही तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती चांगली आहे. या संपूर्ण घटनेत विमानाचे काहीही नुकसान झाले नाही. काही वेळाने विमान लखनौच्या दिशेने उडाले.

