अमळनेर (पोलीस वृत्त) तालुक्यातील शिरुड येथील आज सायंकाळच्या सुमारास लोंढवे शेत शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र हाती काही न आल्याने जागीच पोल खोल झाली.

सविस्तर वृत्त असे की एक अनोळखी शिरूड गावातून मोटर सायकलने लोंढव्या शेत शिवाराकडे गेले असता. त्या ठिकाणी एक शेतकरी शेतातून काम आटोपून घारकडे परतण्याच्या मार्गावर होता. मात्र त्यावेळी शेतकऱ्याला त्या अनोळखी व्यक्तीवर शंका आल्याने व विचारना केली. आपण इकडे काय शोधत आहात तर अनोळखी व्यक्तीने उत्तर दिले. की माझ गुरे- ढोरे शोधत आहे. व अनोळखी व्यक्ती शेती- शिवारात हिंडू लागला नंतर काही वेळाने दुसऱ्या बाजूने दोन तीन मोटरसायकल स्वार आले. याबाबत शंका आजुबाजुला अजून काही दोन-चार शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले. चोरटे असल्याची माहिती गावातील मिळाली. वेडीच गावातील तरुणांनी धाव घेतली. मात्र चोरट्यांना सुरात लागल्याने वेळीच चोरट्यांनी तिथून पळ काढला मात्र पळतेवेळी त्यांची एक मोटरसायकल (स्कुटी) त्याच ठिकाणी सोडुन गेले.
शेतकऱ्यांनी ती मोटरसायकल गावात आणली व पोलिसांना फोन वर या घटेनेची माहिती दिली. काही वेळाने त्या ठिकाणी पोलीस पोचल्याने त्यांनी मोटर सायकलची झाडाझडती घेतली व मोटरसायकलच्या डिक्कीत गावातील शेतकऱ्यांचे विहिरीवरील किरकोळ साहित्य आढळून आले. पोलिसांनी विचारपूस करत शेतकऱ्यांचे ते किरकोळ साहित्य त्यांच्या स्वाधीन केले. या बाबत घटनेची पुढील कारवाई सुरू आहे

