सेवानिवृत्ती नंतर जवानांनी समाजासाठी वेळ द्यावा व ज्या भूमीत जन्मलो त्या भूमीचे पांग फेडावे व आगामी पिढीला आदर्श द्यावा ” असे प्रतिपादन अमळनेरचे D.Y.S.P. राकेश जाधव यांनी केले.
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान अनिल भावराव बाविस्कर हे सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल दि ६ ला शिरूड गावकरयांतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी अनिल बाविस्कर यांचेसह वडील भावराव बाबुराव पाटील,आई मिराबाई पाटील,पत्नी सौ सुनीता ,भाऊ महेश पाटील,सौ अर्चना महेश पाटील या सर्व परिवाराचा सत्कार करण्यात आला.
तदपूर्वी अमळनेर रेल्वेस्टेशन वर जवान अनिल बाविस्कर यांचे आगमन झाल्यावर तेथे वाजंत्री सह जंगी स्वागत करण्यात आले. तेथून शिरूड ला गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठीक ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले.स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावाला अभिमान वाटणारा अतिशय भावनिक असा हा प्रसंग होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मिलिंद पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.पाहुण्यांचे स्वागत भावराव पाटील यांनी शाल श्रीफळ देऊन केले.
सरपंच गोविंदा मच्छीन्द्र सोनवणे, पोलीस पाटील विश्वास महाजन, नारायण सुकलाल पाटील ,खानदेश रक्षक फौंडेशन चे धनराज रामदास पाटील आणि टीम, भाजप च्या भैरवी वाघ-पलांडे,श्याम अहिरे,दर्शना पवार,पं स. सदस्य भिकेश पावभा पाटील, राकेश पाटील, आदींनी जवान अनिल बाविस्कर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, बाजार समितीच्या प्रशासक सौ तिलोत्तमा रवींद्र पाटील,किसान सेलचे अध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अनिल बाविस्कर यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. धनगर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकांत पाटील, कल्पेश महाजन, किशोर पाटील, मिलिंद पाटील, डी ए धनगर, रवी धनगर, विकास महाजन, नामदेव महाजन, महेश पाटील, विजू टेलर, विकास पाटील, राजेंद्र पाटील, गणेश बोरसे, शरद पाटील, अजय बोरसे, संदीप पाटील, किरण पाटील, राहुल पाटील व गावातील तरुणांनी परिश्रम घेतले.