अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाइन: अमळनेर महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे आपला उमेदवारी अर्ज दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ ला दाखल करणार आहेत..
विधानसभा निवडणुक २०२४
अमळनेर विधानसभा मतदारसंघ
आपल्या हक्काचा माणूस डॉ.अनिल नथ्थु शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोची संख्येने सहभागी व्हा..!चला परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होवु या…! असे आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना
काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी केले आहे..
डॉ अनिल शिंदे वैद्यकीय क्षेत्रातील एक निष्णांत डॉक्टर आहेत ..त्यांचा अनेकांशी चांगला संबंध आहे.. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जर ठरवलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडू शकतो अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिली..
डॉ अनिल शिंदे यांनी सांगितले की
मला सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मनापासून मदत करतील असे त्यांनी सांगितले..
मी गेल्या ४० वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ काम केले.. पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली ..मी महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले..