जळगाव : पोलीस वृत्त न्युज: जळगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार सुरेश भोळे आज, सोमवारी (ता. २८) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातून रॅली काढली जाणार आहे.
आमदार सुरेश भोळे सोमवार, २८ रोजी महायुतीतर्फ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना, आरपीआय या पक्षांचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत राहणार आहेत. आमदार भोळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्ह्यातील तिन्ही मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, महायुतीचे सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उमेदवारी अर्ज रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत दाखल करण्यात येईल. या शक्ती प्रदर्शन रॅलीकरीता महायुतीतर्फे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. जनतेने आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने निवडून द्यावे असेही, आवाहन आ.भोळे यांनी केले आहे.