जळगाव: पोलीस वृत्त न्युज: ना. गिरीशभाऊ महाजन नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा घोषित झाले असून, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात भाजपा निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागलेली आहे. इतर पक्षाच्या मानाने भाजपाची संघटना व संघटनात्मक कार्य व निवडणूक यंत्रणा ही ईतर पक्षाच्या मानाने अव्वल त्याच दृष्टिकोनातून आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी भाजपा कार्यालय जी एम फाउंडेशन येथे दुपारी 1: वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली
होती या बैठकीस जळगाव लोकसभेचे प्रभारी व MP राज्यसभेचे खासदार बन्सीलालजी गुजर यांच्या व ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शना खाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये जळगाव शहर विधानसभेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची 109 कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी बन्सीलालजी गुजर यांनी विविध समित्याच्या सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना समजून सांगितली व आपल्या दिलेले काम योग्य प्रकारे आपण सांभाळून करायचे असे त्यांनी सूचना दिल्या तसेच या प्रसंगी ना गिरीशभाऊ महाजन यांनी जळगाव शहर विधानसभा मागच्या वेळी सुद्धा जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्याने राजू मामांना मिळाले होते त्याच अनुषंगाने यावेळेसदेखील जळगाव शहरातून राजुमामांना एक लाखाच्या मताधिक्याने जळगाव ची जनता मताधिकाने निवडून देईल असा आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांना सांगितले आता सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाच्या व महायुतीच्या ऊमेदवाराचा प्रचार करून शासनाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले व आपण एकजुटीने एक ताकतीने प्रकाराला सूरवात करावी अशी घोषणा कार्यकर्त्यांना केली. या बैठकीत आ सुरेश भोळे (राजूमामा) शहर जिल्हाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे मा जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राध्येशाम चौधरी शहर विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, सरचिटणीस अरविंद देशमुख महेश जोशी, जितेंद्र मराठे सौ ज्योतीताई निंभोरे किशोर ढाके सुभाष शौचे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक डॉ राध्येशाम चौधरी यांनी केले.