नांदेड: पोलीस वृत्त ऑनलाईन: घरातील किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलत एका पोलीस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडून पत्नीचा खून केला. ही खळबळजनक घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव परिसरात १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.
आरोपीचे नाव अफजल पठान (afjal Pathan)असे असून तो नांदेड येथील विमानतळ ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.
अफजल पठाण यांचे त्यांच्या पत्नी नाजीम बेगम (najim begam)यांच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात पठाण यांनी त्यांच्या जवळ असलेल्या बंदुकीतून पत्नीवर गोळ्या झाडल्या. यामध्येनाजीम बेगम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अफजल पठाण हे स्वतः ग्रामीण ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती आहे. ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.