पटणा (बिहार): पोलीस वृत्त ऑनलाईन – मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध होते. त्यातून एक धक्कादायक घटणा समोर आली आहे. भाच्याच्या पत्नीला हे समजल्यानंतर भाच्याने आपल्या पत्नीला ॲसिड पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना भागलपूरच्या नवगचिया गावामध्ये घडली आहे.
नातेसंबंधांना लाजवेल अशी घटना उघड झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
बिहारमधील नवगचिया गावातील रहिवासी मोहम्मद फयाज (Mohammed faiyaz) याने पत्नी शबनम (Shabnam)खातूनची हत्या करून तिचा मृतदेह कोसी नदीत फेकून दिला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोहम्मद फयाज याने त्याच्या मामीसह पत्नीच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर त्याने पत्नीला ॲसिड पाजल्याचे तपासात उघड झाले. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
आरोपी मोहम्मद फैयाज याने पोलिसांना सांगितलं की, त्याचे आणि त्याच्या मामीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. पत्नी शबनम दोघांच्या प्रेमाला विरोध करत होती. याच कारणावरुन आरोपी मोहम्मदला राग अनावर झाला. त्याने मामीसोबत मिळून पत्नीला आपल्या प्रेमाच्या वाटेतून हटवण्यासाठी कट रचला. ठरल्याप्रमाणे दोघांनी शबनमला आधी शबनमला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला जबरदस्तीने ॲसिड पाजले. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला.
आरोपीने पत्नीचा मृतदेह नदीच्या जोरदार प्रवाहात फेकून दिला होता. अद्याप शबनम खातूनचा मृतदेह मिळालेला नाही. स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेहाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी मृत शबनमचा पती आणि त्याच्या मामीला अटक केली आहे.