अमळनेर – (पोलीस वृत्त) तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील एफ वाय बी एससी वर्गात शिकणाऱ्या एका तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले आहे

सविस्तर वृत्त असे की अमळनेर तालुक्यातील इंद्रापिंप्री येथील ललित रंगराव पाटील (वय-२०) हा तरूण विद्यार्थी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय येथे एफ वाय बीएस्सी वर्गात शिकत होता. आई बाहेगावी गेली असता आज दुपारच्या सुमारास याने आपल्या राहत्या घरात बाहेरून कुलूप लावून आत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
आई दुपारी गावाहून परतल्याने आईने घर बंद अवस्थेत व बाहेरून कुलूप लावल्या स्वरूपात पाहिले याबाबत आजूबाजूला विचारणा केली असता. आईने मोबाईल द्वारे ललितला संपर्क साधला असता. ललितचा मोबाईलचा आवाज घरातून आला याबाबत आईने खिडकीतून डोकाऊन पाहिले असता. ललित गडफास घेऊन लटकलेल्या स्वरूपात आढळला याबाबत परिसरात खडबळ उडाली. नुकताच (FY.Bsc) चा निकाल लागल्याने ललितला परीक्षेत अपयश आल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. तरूण ललितच्या मृत्युने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

