पुणे – (पोलीस वृत्त- न्यूज नेटवर्क) पुणे- सातारा हायवेवर एक थरारक घटना घडली आहे. स्वत:चा जीव धोक्यात असताना एका एसटी ड्रायव्हरने प्रसंगावधानता दाखवल्यामुळे २५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. अशा या ड्रायव्हरच्या कार्याला सलाम मात्र दुःखद घटना ड्रायव्हरने आपला प्राण गमावला आहे

पुणे सातारा हायवेवर धावणाऱ्या एसटी बस मधील ड्राव्हरला हार्ट ॲटक आलामात्र, त्याने बस बाजूला घेतली यामुळे मोठी दुर्घटना टळलेय आणि यामुळे बस मधील प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. बस थांबवल्यानंतर काही वेळातच ड्रायव्हरचा मृत्यू झाला. मृत्यू पूर्वी चालकाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी चक्कर आल्याचे जाणवल्यानं बसचालकाने, प्रसंगावधान दाखवत बस वेळीच रस्त्याच्या बाजूला घेतल्यानं, २५ प्रवाशांचे प्राण वाचलेत. जालिंदर पवार असं ४५ वर्षीय मृत्यू झालेल्या बस चालकाचं नावयं. पुणे – सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजळ ही घटना घडलीय. बस चालकाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय.

