खान्देश : पोलीस वृत्त ऑनलाईन: जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल खंडऱ्यागड गाव मध्य प्रदेशात टोकाला आहे गावात ४० ते ४५ घरे असतील आणि वीज नाही अर्धा किलोमिटर पाई चालत नदी ओलांडत गावात पोहचता येते मातीची घरे अन् जंगला डोंगरावर असलेली जिल्हा परिषदेची शाळा हीच खंडऱ्यागड पाड्याची कहाणी आहे. शाळेत १८ ते १९ विद्यार्थी आहेत. शिक्षक आहेत पण वर्ग नाही फक्त पालापाचोळ्याची भिंत वर छप्पर शाळेची दुरावस्था पाहून मन हळदवे झाले. गावकऱ्यांनी आणि शिक्षण समितीने पत्र पाठवून मदत माग ितले वर्ग खोली बांधण्यासाठी लोकांना साहित्य हवे होते मग ठरवले आम्ही या मुलांसाठी एक चांगला वर्ग बांधु या उत्कर्ष एक सामाजिक जाणीव आमच्या संस्थेच्या वतीने लोकांना मदत जमा करण्याचे आवाहन केले अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. आणि आम्ही वर्ग बांधू शकलो ३ फेब्रुवारी २०२४ रोजी खंडऱ्यागड पाळ्यातील नवीन वर्गाचा शुभारंभ झाला मुंबई नाशिक पुणे या ठिकाणाहून अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ‘एक वीट माझी समूहाचे’ गौरव महाले सर प्रमुख अतिथी म्हणून काल कार्यक्रमास लाभले या कार्यक्रमासाठी मदत करणारे सर्व दानशूर व्यक्ती आणि संस्था एक वीट माझी आणि सावली संस्था आणि या प्रयत्नांमध्ये अथक प्रयत्न करणारे योगेश महाजन आणि दिवाकर बोरसे यांचे मनापासून आभार हा बदल केवळ एका वर्गापुरता मर्यादित नाही हे खंडऱ्यागड पाड्यातील शिक्षणाच्या भविष्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. उत्कर्ष ही संस्था गरजू मुलांना शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहित करत असते बदलापूर येथील उत्कर्षालय या वस्तीगृहाच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांच्या शिक्षणासाठी उत्कर्ष संस्था काम करते यासाठी होणारा खर्च हा लोकसभागातून केला जातो.