धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री. आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टद्वारा अ क्युप्रेशर, सुजोक, वायब्रेशन व नॅचरल थेरेपी चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टद्वारा अॅक्युप्रेशर, सुजोक, वायब्रेशन व नॅचरल थेरेपी चिकित्सा शिबीर श्री. आदिनाथ दिगंबर जैन मंदिर हॉल येथे भव्य शुभारंभ करण्यात आला हे शिबिर . 3 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते 8 वेळेत घेतले जाणार आहे. या शिबिरासाठी प्रसिद्ध थेरपिस्ट ऍक्युप्रेशर रिसर्च ट्रीटमेंट संस्थान, जोधपूर (राजस्थान) चे तज्ञ मुकेश चौधरी आणि गुरुप्रीत सिंह यांचा मार्फत तपासणी करण्यात येणार आहे या शिबिराचे उदघाटन प रा विद्यालयाचे सचिव डॉ मिलिद डहाळे शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मा नगराध्यक्ष पी एम पाटील सर भाजपा ओ बी सी सेल जिल्हा अध्यक्ष ऍड संजय महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे ओ बी सी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मा नगराध्यक्ष पुष्पा ताई महाजन काँग्रेस चे जेष्ठ नेते सम्राट परिहार , विजय महाजन , शहर प्रमुख शिवसेना उ बा ठा भागवत चौधरी, शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख विलास महाजन पुणीलाल आप्पा महाजन भाजप शहर प्रमुख दिलीप महाजन , मा नगरसेवक नंदू पाटील युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन भाजपा जेष्ठ नेते कमलेश तिवारी जेष्ठ पत्रकार धर्मराज मोरे तालुका अधिकृत पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष विनोद रोकडे पत्रकार अविनाश बाविस्कर सीताराम मराठे याचा हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे महत्त्व सांगण्यात आले या शिबिरात
खालील आजारांवर होणार उपचार होणार !
गुडघेदुखी, सायटिका, डोळे,कान,नाक,दमा,गळ्याचे रोग, लठ्ठपणा, कब्ज-गॅस, सर्वाईकल आजार, मानदुखी, कंबरदुखी, संधिवात, लकवा, ब्लडप्रेशर, डायबेटीस, थायरॉईड, मानसिक ताण, झोप न येणे, उंची वाढणे यावर उपचार करण्यात येणार आहे
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन उपाध्यक्ष प्रतीक जैन, सचिव श्रेयास जैन, कोषाध्यक्ष अजय महाजन , सदस्य उदय डहाळे, सावन जैन निकेत जैन यांनी मेहनत घेतली


