सोलापूर: लहान मुलं घरात असली की ती दंगामस्ती करतात. ते काही ना काही खोड्या काढताच राहतात त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांचाही जीव मेटाकुटीला येतो. मात्र, अशावेळी पालक मुलांना रागवतात, त्यांना समजवतात. मात्र, सोलापुरातील एका निर्दयी पित्यानं त्याचा मुलगा खोड्या काढतो म्हणून त्याचा जीवच घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. मुलाच्या खोडकरापणाला कंटाळून रागाच्या भरात मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून त्याला मारल्याची स्वत: कबुली पित्याने दिली आहे. विजय सिद्राम बट्टू असे आरोपी पित्याचं नाव आहे.
नेमका प्रकार काय?
गेल्या 13 जानेवारीला विशाल विजय बट्टू हा 14 वर्षाचा मुलगा बेपतत्ता तक्रार आई, वडीलांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री 11 च्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळी विशाल बट्टू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेचच नातेवाईकांना बोलावून ओळख पटवली असता मृतदेह विशालचेच असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांना पित्यावर आला संशय
विशालचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आधी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिसांना या प्रकरणी विशालचा घातपात झाल्याचा संशय होता. पोलिसांनी सगळ्या नातेवाईक आणि त्याच्या मित्रांची चौकशी केली मात्र, संशयाची सुई ही वडिलांकडे जात होती. त्यातच आरोपी वडील विजय बट्टू याने पत्नी कीर्ती बट्टूकडे आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे म्हटले. ही बाब लक्षात येताच कीर्तीने पोलिसांना माहिती दिली. सोलापुरातल्या जोडभावी पेठ पोलिसांनी या तात्काळ विजय बट्टू यांना ताब्यात घेतं त्यांची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर आरोपी विजय बट्टू याने आपल्या मुलाती हत्या केल्याची बाब कबुला केली.
15 दिवसांनी आरोपीने स्वतःहून दिली कबुली
घटना घडल्यानंतर 15 दिवसांनी आरोपीने स्वतःहून कबुली दिली. “माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. विशालच्या सततच्या शाळेतील खोडकरपणाला, मोबाइलवर नको त्या गोष्टी पाहिल्यानं रागाच्या भरामध्ये मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून त्याला मारले.” अशी कबुली आरोपी विजय बट्टू याने दिली.
या प्रकरणी विजय बट्टूवर भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी बट्टूला न्यायालसमोर हजर केलं असता न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.


