छत्रपती संभाजीनगर: पोलीस वृत्त ऑनलाईन- जिल्ह्यात एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. कन्नड तालुक्यातल्या मोहरा येथे एका २२ वर्षीय गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पल्लवी दिनेश गाडेकर असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पल्लवी यांचे पती दिनेश गाडेकर हे सैन्यदलात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे कुटुंब हे मोहरा शिवारात डोंगराच्या पायथ्याशी राहत होते. पल्लवी ९ महिन्यांच्या गर्भवती होत्या. शनिवारी (२७ जानेवारी) दुपारच्या सुमारास पल्लवी घराबाहेर पडल्या. मात्र, खूप वेळ होऊनही त्या परतल्या नाही. कुटुंबियांनी शोधाशोध घेतली असता, त्यांचा मृतदेह राजेंद्र गाडेकर यांच्या गट नंबर १५० मधील विहिरीत मृतदेह आढळून आला.दरम्यान वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थली धाव घेत पल्लवी यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

