मनवेल ता.यावल : पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज- येथील २५ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की मनवेल ता. यावल येथील रहिवाशी पुष्पा जितेंद्र कोळी वय २५ ही तरुणी सोमवार २२ जानेवारी रोजी रात्री आपल्या घरी होती. घरात असताना सायंकाळी तिने घरातील लाकडी दांडीला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व तरूणीस यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात देविदास कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.
मयत तरुणीच्या पत्शात आई वडील एक भाऊ असून शोकाकुल वातावरणात अतिंम संस्कार करण्यात आले. आहे.

