पालघर: रेल्वे अपघाताची एक दुर्घटना समोर आली आहे. वसई आणि नायगांव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेनच्या अपघातात तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना काल राञी 8.50 वाजता घडली आहे. रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम हे तीन कर्मचारी करत होते. आणि त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे
चिफ सिग्नल इन्स्पेक्टर वासू मिञा Vasu Mishra (वय 56), टेक्निशिअन सोमनाथ उत्तम Somnath Uttam (वय 36), असिस्टन्ट सचिन वानखडे Sachin Wankhede (वय 35) असे मयत रेल्वे कर्मचा-यांची नावे आहेत. हे तिघे वसई रेल्वेस्थानकाच्या अर्धा किमी दूर (50/1) हा अपघात झाला आहे. नायगाव वसई रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक चेंज करण्याची पाईंट मशिन फेल झाली असल्याने त्याच्या तपासणीचे काम करत होते. त्याच दरम्यान विरारहून चर्चगेटला जाणारी राञी 8.50 ची लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 हून चर्चगेटच्या दिशेने जात असताना, हे तिघे ही कर्मचारी रेल्वे खाली आले. यात तिघांचा ही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर
रेल्वे अपघातात एकाचवेळी तीन कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याने वसई विभागातील सर्व रेल्वे कर्मचारी आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सध्या तिघांचे ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, यातील सोमनाथ उत्तम यांचा मृतदेह सोलापूरला त्यांची गावी नेण्यात आला. सचिन वानखडे यांचा मृतदेह नागपूरला नेण्यात आला तर वासू मिञा यांचा मृतदेह वसई येथे नेण्यात आला आहे. हा अपघात कसा झाला. यात निष्काळजीपणा कुणाचा याबाबात आता रेल्वे प्रशासन चौकशी करत असल्याच सांगण्यात येत आहे.
निष्काळजीपणा कुणाचा?
मुंबईच्या उपनगरीय सेवेच्या अर्थात लोकल ट्रेनच्या माध्यमातून लाखो मुंबईकर प्रवास करतात. त्यामुळे लोकल ट्रेन ही लाखो मुंबईकरांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनली आहे. रेल्वेच्या मार्गांची देखभाल करणाऱ्या कामगार आपल्य जिवावर उदार होऊन काम करत असतात. दोन मार्गामध्ये उभा राहून काम करत असतात. काम करताना वेगात जाणाऱ्या गाडीचा धोका असतो. मुंबईत तर मिनिटाला लोकल जातात. त्यामुळे अनेक वेळा धक्का लागून कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे किंवा काही वेळा मृत्यू पावल्याची घटना समोर आल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून मात्र यासंदर्भात कोणतीही ठोस पावले उचलल्याचे चित्र दिसत नाही.


