नवी मुंबई: पोलीस वृत्त ऑनलाईन: चारित्र्याचा संशय जीवावर बेतल्याची एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. गॅरेज मालकाच्या प्रेमात पडणे एका महिला बँक मॅनेजरला महागात पडले आहे. बँक मॅनेजर असलेल्या महिलेवर संशय आल्याने गॅरेज मालकाने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल मध्ये बोलवून तिची हत्या केली आहे. या घटनेतील आरोपीचे शोएब शेख असे नाव असून त्याने 8 जानेवारी रोजी महिलेची हत्या करून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कौर असे मृत महिलेचे नाव आहे. अटक केल्यानंतर आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले की, अमित कौर ही एका बँकेत मॅनेजर होती आणि तिचा घटस्फोट झाला होता. दोघेही काही काळापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटले होते. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि लवकरच लग्न करणार होते. मात्र आरोपी शोएबला संशय होता की त्याच्या गर्लफ्रेंडचे आणखी कोणाशी तरी संबंध आहेत. याशिवाय अमित कौर शोएबवर लग्नासाठी वारंवार दबाव टाकत होती. त्यामुळे शोएबने 8 जानेवारीला अमित कौरला तिच्या वाढदिवसादिवशी नवी मुंबईतील तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये नेले. दोघांनीही वाढदिवस आनंदात साजरा केला. मात्र त्यानंतर अमित कौर पुन्हा लग्न करण्यावर ठाम होती. त्यामुळे रागाच्या भरात शोएबने अमित कौरचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर शोएबने तिथून पळ काढला.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी शोएबला एकटे जाताना पाहिल्यानंतर त्यांना संशय आला. काही वेळाने त्यांनी दरवाजा उघडला रुममध्ये पाहिले असताना त्यांना अमित कौरचा मृतदेह बेडवर पडलेला अवस्थेत आढलून आला. यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतली आणि याप्रकरणी पुढील तपासाला सुरुवात केली. यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी साकीनाका परिसरातून आरोपीला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, त्याला अमित कौरवरच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे त्याने तिची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली