चोपडा: पोलीस वृत्त ऑनलाईन: चोपडा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या २ वर्षीय चिमुरड्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित लोटन पाटील (56) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
मंगळवार, 9 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोटन पाटील याने अवघ्या दोन वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे हे करीत आहेत.


