• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शनिपेठेत घरोघर पोहचले श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

policevrutta by policevrutta
January 11, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शनिपेठेत घरोघर पोहचले श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


संकल्प महिला मंडळातर्फे घरोघर अक्षदा वितरण
परिसरात साजरा होणार उत्सव

जळगाव, पोलीस वृत्त ऑनलाईन- दि.११ – संपूर्ण देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा केला जात आहे. अयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार असल्याने जळगावातील शानिपेठ परिसरातील संकल्प महिला मंडळातर्फे घरोघर अक्षदा वितरण करण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयघोषात अक्षदा आणि माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती.

देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा आनंदोत्सव सुरू असून प्रत्येक गावात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. जळगाव शहरातील शनिपेठेत असलेल्या जय श्रीराम मित्र मंडळ आणि संकल्प महिला मंडळातर्फे अयोध्या येथून आलेल्या मंत्रित अक्षदांचे परिसरात वितरण करण्यात आले. मुख्य चौकात माजी होमगार्ड समादेशक रमेश दलाल यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून अक्षदा वाटपाला वाजत गाजत सुरुवात करण्यात आली. घरोघरी जाऊन अक्षदा आणि माहिती पुस्तिका देऊन सर्वांना दि.२२ जानेवारी रोजी होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

शनिपेठेत दररोज आनंदोत्सव साजरा केला जाणार असून दि.२२ रोजी मुख्य चौकात सकाळपासून धार्मिक कार्यक्रम आणि भजनचे आयोजन केले जाणार आहे. परिसरातील सर्व भाविकांना अक्षदा निमंत्रण देताना उपक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. प्रसंगी संकल्प महिला मंडळाच्या राजकुमारी उपाध्ये, छाया चौधरी, शीतल जोशी, वंदना शिंदे, दीपा पवार, हेतल पाटील, श्वेता देवरे, काजल चौधरी, नंदिनी चौधरी, पूजा चौधरी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमोद निकुंभ, पराग महाशब्दे, जय श्रीराम मित्र मंडळाचे राजेंद्र उपाध्ये, संजय शिंदे, मोहित प्रजापती, जितेंद्र माळी, हर्षल चौधरी, चेतन वाणी, मयूर चौधरी, विजय देवरे, रोहित जोशी, गौरव चौधरी, देवेंद्र चौधरी, निखील जोशी, कुणाल कांकरिया, साहिल जोशी, कार्तिक प्रजापती आदींसह मंडळाचे इतर भाविक उपस्थित होते.

Previous Post

Jalgaon news! फ्रिजमध्ये ठेवलेले दागिने लांबवले

Next Post

संतापजनक! चोपड्या दोन वर्षीय चिमुरडीचे लैंगिक शोषण

policevrutta

policevrutta

Next Post
संतापजनक! चोपड्या दोन वर्षीय चिमुरडीचे लैंगिक शोषण

संतापजनक! चोपड्या दोन वर्षीय चिमुरडीचे लैंगिक शोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!