जळगाव पोलीस वृत्त ऑनलाईन– फ्रिजच्या फ्रिजरमधे ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने लांबीविल्या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मोलकरणीसह तिच्या मैत्रीणीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,जळगाव शहरातील आदर्श नगरात राहणा-या शिक्षीका अर्चना ढुमे यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला आहे. खासगी शाळेच्या शिक्षिका अर्चना ढुमे(archana dhume) या एका विवाह सोहळ्या निमीत्त परगावी गेल्या होत्या. या कालावधीत शेजा-याकडे ठेवण्यात आलेली घराची चावी मोलकरणी घेत असे. घरातील कामकाज आटोपल्यानंतर मोलकरणी घराला कुलुप लावून ती चावी पुन्हा शेजा-याकडे ठेवत असे. विवाह सोहळा आटोपल्यानंतर घरी आल्यानंतर फ्रिजच्या फ्रिजरमधील दागिने गायब झाल्याचे आढळून आले. 3 लाख 45 हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. रोहीदास गभाले करत आहेत.

