भडगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– तालुक्यातील महिंदळे येथील शेतकरी धरम लोटन खैरनार यांच्या घरात ठेवलेल्या ७ ते ८ क्विंटल कापूस घरातून चोरून नेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे प्रमाण नुकसान झाले याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. यावर्षी परिसरात पावसाच्या प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे यात कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस ठेवून राखला आहे. त्यावरही चोरट्यांची नजर पडली आहे शेतकरी धरम लोटण खैरनार यांच्या घरातून रात्रीचा फायदा घेत चोरट्याने अंदाजे सात ते आठ क्विंटल कापूस चोरून नेला आहे याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.(बातमीत प्रसिध्द फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी!)
–


