अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – लोंढवे येथील चाकू हल्ल्यातील प्रमुख आरोपी सोनू उर्फ संदीप पारधी याला अटक करण्यात आली. असून न्यायालयाने ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे लोंढवे येथील ढाब्यावर पिण्याच्या पाण्यावरून वाद होऊन जानेवे येथील संदीप उर्फ सोनू पारधी याच्यासह अजय पारधी जगन्नाथ पारधी यांनी मालक मनोहर पाटील याच्यासह पवन धनगर, योगेश पाटील, काळू भील यांच्यावर चाकू हल्ला केला होता. पो. नि विजय शिंदे व त्यांच्या पथकाने अजय व जगन्नाथ दोघांना त्याच दिवशी अटक केली होती सोनू फरार होता अखेर पोलिसांनी त्याला अटक केली यात पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे यांनी न्यायालयात हजर केले असता न्या.येलमाने यांनी ११पर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे यापूर्वी पकडण्यात आलेले अजय पारधी याला सुद्धा अकरापर्यंत पोलीस कुठे कोठडी व जगन्नाथ पारधी याला न्यायायीन कोठडी सुनावण्यात आली.