पोलीस वृत्त ऑनलाईन : ऑनलाईन गेम पब्जी खेळताना भारतातला सचिन आणि पाकिस्तानातील सीमाचं सूत जुळलं. दोघंही या ऑनलाईन प्रेमात अखंड बुडाले अन् अखेर सीमा पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह थेट भारतात दाखल झाली. नेपाळमार्गेत ती उत्तराखंड या सचिनच्या घरी आली.
पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेली व्यक्ती आहे. पब्जी हा ऑनलाईन गेम खेळताना उत्तराखंडमधील सचिन मीणाच्या प्रेमात पडलेल्या या चार मुलांच्या आईनं आता आणखी नविन वर्षाच्या सुरवातीला एक गुड न्यूज दिली आहे. सीमा हैदर याच वर्षी सचिनच्या बाळाची आई होणार आहे. एका न्यूज चॅनेलला मुलाखतीत तीनं ही माहिती दिली. आज तकनं याबाबत वृत्त दिलं आहे
माध्यमातील वृत्तानुसार, सीमा हैदरची मुलाखत सुरु असताना सचिन आणि सीमा यांच्या नात्यावर काही प्रश्न विचारले गेले. यावेळी लवकरच आमचं मुलं असेल अशा शब्दांत तिनं एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. सचिनच्या कुटुंबियांनी देखील सीमा हैदर प्रेग्नंट असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे