जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन – जळगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री घरात सर्वांसोबत गप्पा करत सोबत जेवण देखील केले. जेवण आटोपल्यानंतर परिवारातील सर्वजण झोपले. यानंतर विवाहितेने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.हि घटना जळगाव तालुक्यातील किनोद येथे घडली असून तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किनोद (ता.जळगाव) (kinoda- jalgaon)अश्विनी विशाल चौधरी (वय २४) Ashwini Vishal Patil असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे पती विशाल हे जळगावात खाजगी क्षेत्रात काम करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान ३० डिसेंबरला पहाटे तीन वाजता सदरची घटना उघडकीस आली. २९ डिसेंबरला घरातील सर्व जणांनी सोबत जेवण केले. यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. शनिवारी मध्यरात्रीनंतर विवाहितेने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे ३ वाजता पती पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांनी पत्नीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आल्यानंतर पटीने एकच आक्रोश केला. महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. विवाहितेच्या पश्चात पती, दीड वर्षाचा मुलगा आहे. यावेळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.