जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन दि. २९ डिसें रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलातुन ०९ पोलीस अधिकारी- अंमलदार सेवानिवृत्त झाले त्यात पोउपनिरी. प्रकाश त्र्यंबक हिवराये, पोउपनिरी. गयासोद्दीन मौजुद्दीन शेख, पोउपनिरी. राजेंद्र दशरथ सोनार, पोउपनिरी. विलास रामदास खुरपडे, पोउपनिरी. अनिल वामनराव आगोणे, सफौ. महेमुदअली कादरअली शाह, सफौ. विजय सुखलाल जोशी, सफौ. सुनिल रामकृष्ण पाटील, सफौ. विनोद सखराम बाऊस्कर असे पोलीस अधिकारी- अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. अशोक नखाते यांच्या हस्ते कुटुंबासह सत्कार करुन निरोप देण्यात आला. सदर प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. संदीप गावीत, पोउपनिरी. रेश्मा अवतारे, मानव संसाधन विभाग आदी मान्यवरांसह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोउपनिरीक्षक, रावसाहेब गायकवाड, पोहेकॉ सतिष देसले यांनी परीश्रम घेतले.