अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन- तालुक्यातील कावपिंप्री व इंद्रापिंप्री गावांमध्ये स्थानिक अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करत असून, या गावठी दारू विक्रेत्यांमुळे अनेक जन व्यसनाधीन होत असुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री लगत इंद्रापिंप्री हे दोन्ही गावे एकमेकांना जोडले असून दोन्ही गावांमध्ये सर्रास गावठी हातभट्टी दारू विक्री होत आहे याबाबत गावठी दारू विक्री विरुद्ध अवैध दारु विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई झाली नसून यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. दारुमुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला असून त्यांचा संसार व परिवार उघड्यावर आला आहे. येणारी तरूण पिढी व्यसनाधीन होत असून पोलीस प्रशासनाने यांचेवर कठोर कारवाई करून अवैध गावठी दारू विक्री कायम स्वरूपी बंद करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


