अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– रात्रीच्या सुमारास उभ्या कारला अचानक लागलेल्या आगीत दोन जण जखमी झाले आहेत. आग लागली तेव्हा दोघेजण कारमध्ये झोपलेले होते. ही घटना घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

राजस्थानमधील काही संसार उपयोगी वस्तू विक्रेत्यांनी अमळनेर शहराच्या बाहेर आपले बस्तान बांधले आहे. दिवसभर साहित्य विकून हे विक्रेते कारमध्येच आपला विसावा घेत असतात. दरम्यान २६ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास देखील अशा प्रकारे विसावा घेत असताना कारमध्ये अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. यावेळी कारमध्ये झोपलेल्या दोघांना आगीचे चटके बसल्याने ते भाजले आहेत.
कारला आग लागल्यानंतर वेळीच कारमधून ते बाहेर पडण्यात त्यांना यश.मिळाल्याने दोघांचा जीव वाचला असून अनर्थ टळला आहे. या घटनेत परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती कळवतात काही वेळात अग्निशनमबंब दाखल होऊन त्यांनी आग विझविली. मात्र त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही

