लातूर: पोलीस वृत्त ऑनलाईन– लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. तुळजापूर- औसा महामार्गावर कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन शिक्षकांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे शिक्षक जि.प शिक्षक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पण जागीच मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. बाबा पठान, जयप्रकाश बिराजदार, संजय रणदिवे, राजू बागवान अशी अपघात मृत्यूमुखी पडलेलल्या व्यक्तींची नावे आहेत.औसा तालुक्यातील शिवलीहून औसाकडे येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. शुक्रवारी मध्यरात्री 12:50 वाजता औसाजवळील साईप्रसाद हॉटेलसमोर घडली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचे इंजिन 30 फुटांवर जाऊन पडले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. पहाटे 4:30 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतांमध्ये महेबूब मुन्नवरखान पठाण, जयप्रकाश मोतीराम बिराजदार, संजय बाबुराव रणदिवे तर चालक राजेसाब नन्हु बागवान यांचा समावेश आहे.