अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेला पळवून नेत सोडून पळून गेलेल्या तरुणाविरुद्ध अमळनेर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका प्राध्यापक तरुणीचे सचिन नाना पाटील (रा शिरूड) याच्याशी प्रेम संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी त्याने प्राध्यापिकेला लग्नाचे आमिष दाखवले व १८ रोजी सचिनने त्या तरुणीला मोटरसायकलने तिला धडगाव येथे लग्न करण्यासाठी नेले. सचिनने त्याच्या आईला पीडित तरुणीशी लग्न करणार असल्याचे सांगितल्याने त्याच्या आईने लग्न करण्यास नकार दिला. त्याचवेळी त्याला त्याच्या नातेवाईकांचा देखील लग्न न करण्यासाठी फोन आला. पीडित तरुणीने त्याला लग्न करू असे सांगितल्यानंतर सचिन तिला घेवून मोटरसायकलवर घेऊन निझरकडे निघाला. रस्त्यात सचिनने दारू पिऊन तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला तो त्या तरुणीला सोडून निघून गेला. तरुणी रडत असतांना आजूबाजूच्या लोकांनी तिच्या मोबाईलवरून लोकेशन देऊन तिच्या नातेवाईकांना बोलावले. तरुणीला सोबत घेऊन नातेवाईकांनी अमळनेर पोलीस स्टेशन गाठत पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून सचिन विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय भगवान शिरसाठ करीत आहेत.


