चोपडा: पोलीस वृत्त ऑनलाईन- कौटूंबिक वादातून कुठल्यातरी धारदार हत्याराने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात घडली. या घटनेत रेखाबाई दुरसिंग बारेला(rekhabai durSingh barela) (44) यांचा खून झाला असून संशयित पती दुरसिंग बारेला (47 धनवाडी) यास चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेतातच केली हत्या
सूत्रांच्या माहितीनुसार, योगीराज पाटील यांच्या शेतात रेखाबाई बारेला यांची संशयित पती दुरसिंग बारेला याने सोमवारी रात्री उशिरा कुठल्यातरी वादातून हत्या केली. हत्येनंतर संशयित पसार झाला तर मुले आईच्या मृतदेहाजवळ बसून होती. मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांनी धाव घेतली

चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी 24 तासात खुनाची उकल करीत आरोपीला अटक केली. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

