सोलापूर: पोलीस वृत्त ऑनलाईन- सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. आश्चर्य म्हणजे या तरुणीने आपल्या लग्नाच्याच दिवशी आत्महत्या केली.

परिसरातील दोन तरुणांनी या तरुणीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला, शिवाय तिचे खासगी फोटो परिसरात लिक करु आणि होणाऱ्या नवऱ्याला पाठवून बेअब्रु करु अशी धमकीही दिली आहे.
सालिया शेख असे तरुणीचे नाव आहे, तिने काही दिवसांपूर्वी परिसरातील काही युवक ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप करत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यासोबत आपली लग्न पत्रिकाही जोडली.
तरुणीच्या लग्नाच्या दिवशी येऊन लग्न मोडू आणि तुम्ही काय, कोणीच माझं काही करु शकत नाही, अशी धमकी त्या तरुणानं सालियाला दिली.
सालिया शेख हिने युवकांविरोधात 15 ऑगस्ट रोजी तक्रारी अर्ज दिला होता ज्यामध्ये तिने नमूद केलं होतं की जर सलमान आणि समीर यांनी मला त्रास दिला तर मी आत्महत्या करेन आणि त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे दोघेही असतील.
या संबंधित युवकांकडून तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला धमकीचे फोन आणि मेसेज पाठवले गेले. तरुणीचे अश्लील फोटो एडिट करून संबधित युवकांनी होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याचा आरोप केला. अखेर लग्न मोडल्याच्या धास्तीने तरुणीने स्वत:ला आपल्या लग्नाच्या दिवशीच संपवलं.

