धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील गोविंदसागर govind sagar तलावात सोमवारी Monday (ता. १) मोठी दुर्घटना घडली. येथील तलावात बुडून ७ तरुणांचा मृत्यू झाला.
ही घटना पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोलका बाबा गरीब दास मंदिराजवळ घडली. सर्व मृत( Panjab) पंजाबमधील मोहाली येथील रहिवासी आहेत. यातील चार अल्पवयीन आहेत, तर दोन तरुण एकाच कुटुंबातील आहेत
प्राप्त माहितीनुसार, पवन कुमार (३५), रमन कुमार (१९), लाभ सिंग (१७), लखवीर सिंग (१६), अरुण (१४), विशाल (१८) व शिवा (१६) अशी मृतांची (Death) नावे आहेत. रमण कुमार आणि लाभ सिंग हे एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने सातही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.