रावेर : पोलीस वृत्त ( न्यूज नेटवर्क) कर्जोत गावाजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार झाल्याची जिल्हा हद्रवणारी धक्कादायक घटना घडली आहे. (Sunil Narayan Harijan)सुनिल नारायण हरिजन (वय ३५) आणि (Anil Narayan Harijan )अनिल नारायण हरिजन (वय २३) असे मयत झालेल्या दोघां भावांची नावे आहेत.
खंडवा (khandva) (मध्य प्रदेश) येथील एक परीवार कर्जोत (ता. रावेर) जवळ कामानिमित्त आला होता. सुनिल हरिजन आणि अनिल हरिजन हे या भीषण अपघातात ठार झाले आहेत. दोघांचे लग्न झाले होते आणि त्यांना मुले देखील असल्याचे कळते. तर दोघांचे वडील भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहीती मिळताच पोलिस ग्रामीण रुग्णालयात पोहचले असुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.