जळगाव पोलीस वृत्त (न्यूज नेटवर्क) जळगाव रेल्वे स्थानकावर आज सकाळी ७ वाजेच्या पूर्वी रेल्वे (platform no)प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ रेल्वे लाईन वर एक अज्ञात व्यक्ती कोणत्यातरी एका धावत्या रेल्वे खाली येऊन मृत्यु झाल्याचे समजले सदर व्यक्ती रेल्वे लाईनवर मृत अवस्थेत आढळला. ऑन ड्युटी डी. वाय. एस. एस श्री विनय सिन्हा रेल्वे.पोलीस दूरक्षेत्र जळगाव यांनी दिलेल्या लिखित माहितीनुसार रेल्वे. पो.दूरक्षेत्र जळगाव येथे आरी.नं ३३/२२ कलम १७४ सी.आर.पी.सी प्रमाणे मृत्यूची नोंद करण्यात आली.
सदर व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष शरीर बांधा साधारण उंची १.७४ सें.मी चेहरा व शरीराचे विद्रूप अवस्थेत असून डोळे बंद, नाक सरळ रंग काळा-सावळा कपडे नेहरू मळकट शर्ट पांढरा व पांढऱ्या मळकट रंगाच्या पैजामा कपडे फाटलेले अवस्थेत आढळले सदर व्यक्तीचे ओळख पटवण्याचे आव्हान लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.