जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– दिवसेंदिवस महिलांवर अत्याचाराच्या वाढ होतच आहे. महिला सुरक्षित आहेत का? हे प्रश्न आजही कायम आहेत. यात पुन्हा जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पैशांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ७ जणांविरोधात रविवार, २० ऑगस्ट रोजी पावणे पाच वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील मनिषा राठोड याचा विवाह अकोला येथील नितीन बळीराम राठोड यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर मनीषा हिच्या वडीलांनी लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरुन तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घर बांधण्यासाठी १० लाख रुपये आणावेत अशी मागणी मनीषा हिच्याकडे तिचे पती यांच्यासह सासरच्यांनी केली, तसेच याच कारणावरुन तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला, या छळाला कंटाळून मनिषा राठोड या माहेरी जळगाव येथे निघून आल्या, याबाबत त्यांनी रविवारी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरुन मनिषा यांचे पती निलेश(Nilesh Rathod)राठोड, सासू प्रमिलाबाई राठोड (pramilatai Rathod)दोन्ही रा. अकोला, सचिन बळीराम(sachin Baliram Rathod)राठोड रा अमरावती, बबली सुभाष चव्हाण(babali Subhash Chauhan), सुभाष चव्हाण,(Subhash Chauhan) दोन्ही रा. मुंबई, वसंता जाधव,(vasanta Jadhav) रा जयरामगढ ता. खामगाव व दामोदर काशीनाथ राठोड(damodhar kashiarsm Rathod)रा, पातुर अकोला या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील हे करीत आहेत.

