जळगाव: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये रुग्णाच्या शरीरावरील विविध प्रकारच्या गाठींची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणारे किट हे जुलै-२०२२ पासुन एक्सपायरी झाले होते. मात्र रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करत या ठिकाणी हे किट तसेच वापरण्यात येत होते. अनेक गरजू सामान्य नागरिक शासकीय रुग्णालयाचा लाभ घेत असतात आरोग्य विभागाच्या या गलथान कारभाराबाबत याविषयी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर अन्न व औषधी प्रशासनाने या ठिकाणी छापा टाकत प्रकरणाचा पर्दाफाश केला.
ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्या तक्रारीवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी छापा टाकला. व अशाप्रकारे संपूर्ण प्रकार उजेडात आला.
ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रकाराची तक्रार केली. या तक्रारीवरून शनिवारी (दि.१२) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल माणिकराव, औषध निरीक्षक सो. बा. मुळे यांनी छापा टाकला.
ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी गुरुवारी ( दि. १०) जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती. या तक्रारी त्यांनी म्हटले होते की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी लॅब येथे रुग्णाच्या शरीरावरील गाठीचे निदान होण्यासाठीचे किट हे जुलै २०२२ पासुन एक्सपायर असून गेल्यावर्षभरापासून या किटद्वारेच रुग्णांच्या गाठीचे निदान केले जात आहे. व रुग्णांच्या जीवाशी अशाप्रकारे खेळले जात असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५०० रुग्णांच्या गाठीचे निदान करण्यासाठी कालबाह्य कीट वापरण्यात आल्याचे दिसून येत आहे. या सोबतच इतर विविध गंभीर आजारांवरील औषधी देखील कालबाह्य असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्याचप्रमाणे कोविड काळातील महत्त्वपूर्ण औषधी देखील कालबाह्यपणे वापरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मुदत संपलेल्या औषधी या तीन महिन्याच्या आत नष्ट करणे गरजेचे असताना देखील हे चालू स्टॉकमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.