कोरोनाच्या एका नवीन प्रकाराने ब्रिटनला विळखा घातला आहे. या नवीन कोरोना व्हेरियंटला एरिस (ERIS) असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे जगाची चिंता पुन्हा वाढली आहे.
ब्रिटनच्या आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, हा व्हेरियंट ओमायक्रॉनपासून तयार झाला असून सध्या या व्हेरियंटची प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याचं बोललं जात आहे.
तसेच सध्या ब्रिटनमध्ये कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण प्रति 100,000 लोकांमागे 1.97 टक्के इतकं आहे.त्यामुळे या नवीन व्हेरियंटमुळे ब्रिटनसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा नवीन कोविड लाट येण्याची शक्यता आहे शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
एरिसची लक्षणे काय आहेत? :* ‘एरिस कोरोना व्हेरियंटची मुख्य लक्षणे घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, कफ असलेला खोकला, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे ही आहेत. एकंदरीत, कोरोना व्हायरस बदलत्या वातावरणानुसार स्वत: मध्ये बदल करत असल्याने नवीन व्हेरियंटचा धोका कायम आहे. सर्व देशांनी कोरोनाबाबत सावध राहण्याची गरज असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.


