धरणगांव प्रतिनिधी: विनोद रोकडे दि.१ ‘शिक्षण आपल्या दारी’ हे ब्रीद घेऊन आता भाऊसो गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनने जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव व जळगाव तालुक्यातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती, सैन्य भरती, स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन देण्याचा कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही एक सुवर्ण संधी आहे.
या उपक्रमांतर्गत दि. ५ ते २० ऑगस्ट२०२३ दरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत धरणगाव येथील पी. आर. हायस्कूल तसेच ५ ते २० ऑगस्ट दरम्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत शिरसोली प्र. बो येथील विवेकानंद फाऊंडेशन, ओमनगर येथे मार्गदर्शन वर्ग भरवण्यात येणार आहे. या मार्गदर्शन वर्गात युपीएससी, एमपीएससी, एसएससी, एनडीए, बँक भरती, पोलीस भरती, सैन्य भरती, सरळ सेवा व इतर विषयांवर करिअर काऊंसिलींग आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबीर घेण्यात येईल. हे सर्व प्रशिक्षण अगदी विनामुल्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी 7767949090 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन भाऊसो गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन मार्फत करण्यात आले आहे.
मुलींसाठी विशेष बॅच
विषेश म्हणजे मुलींची संख्या वाढल्यास स्वतंत्र बॅच करण्यात येणार आहे. वय १७ वर्षे वयाच्या पुढील मुले, मुली या उपक्रमाचा लाभ घेऊ शकणार आहे.