सर्वच विरोधी पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार मुंबईमध्य आज मविआच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.तसेच या बैठकीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे अनिल परब,यांची प्रमुख उपस्थिती असेल.एकंदरीत, विरोधकांची तिसरी बैठक पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीमुळे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची संयुक्त बैठक महत्त्वाची समजली जात आहे.

