शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील खर्दे येथील आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. पाटील होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जातोडा केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. अनिल बाविस्कर होते.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन तीन गटात करण्यात आले होते. पहिल्या गटासाठी इयत्ता पाचवी ते सातवी लोकमान्य टिळकांचे बालपण दुसऱ्या गटासाठी इयत्ता आठवी ते दहावी लोकमान्य टिळकांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य तिसऱ्या गटासाठी अकरावी बारावी शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील बोध असा विषय घेण्यात आलेला होता. सदर स्पर्धेत एकूण 38 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.
पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी
प्रथम माळी कृष्णा बबन इयत्ता सहावी
द्वितीय पाटील देवराज शरद इयत्ता सहावी
तृतीय गुजर हेमांगी मुकेश
इयत्ता सातवी
दुसरा गट इयत्ता आठवी ते दहावी
प्रथम पाटील खुशबू मनोज इयत्ता नववी
मराठे निहाल हिरालाल इयत्ता आठवी
मराठे रेणुका मुकेश
इयत्ता आठवी
तिसरा गट इयत्ता अकरावी बारावी
प्रथम रणदिवे मोनिका दिगंबर
द्वितीय खोंडे नेहा अशोक
तृतीय पटेल विशाखा तुंबेश
असे प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. जे. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पी.एस.अटकळे यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी. बी धायबर, वाय .डी.मिठभाकरे , श्रीमती एस. जे. सूर्यवंशी, श्रीमती मनीषा पाटील,पी. एस. अटकाळे, बी. एस. बडगुजर, अमोल सोनवणे, , डी .एम. पवार , डी. डी. जाधव,बी .एस .पावरा तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.