नाशिक: पोलीस वृत्त ऑनलाईन: सप्तशृंगी गड गणपती टप्प्यावरुन दरीत कोसळली
बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असावेत असा अंदाज
प्रत्यक्षात प्रवासी आणि जखमींची संख्या अद्याप समजलेली नाही.सप्तश्रृंगीगड घाटात बसला अपघात झाला आहे. गणपतीटप्प्यावरून बस घाटात कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या खाजगी बसमध्ये १५ ते २० प्रवासी प्रवास करत होते असे सांगितले जात आहे. दरम्यान बसमध्ये असलेले प्रत्यक्षात प्रवासी आणि जखमींची संख्या ही मात्र अद्याप स्पष्ट झाली नाहीये. सप्तशृंगगड ते खामगाव (बुलढाणा) या मार्गावरील बसला अपघात झाला आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सप्तशृंगगडावर रात्री ही बस मुक्कामी असल्याचे समजते.


