जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– दि.२.०७.२३ रोजी सकाळी ३.४० वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात रेल्वे गाडीचा धक्क्याने जखमी झाल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत अनोळखी पुरुषाचे ओळख पटण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
(जी.आर.पी) रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रेल्वे मेन लाईन बजरंग बोगदा जवळील के एम ४१६/२५ डाऊन लाईन खांब्याजवळ एक अनोळखी पुरुष कोणत्यातरी रेल्वे लाईनच्या धक्क्याने जखमी अवस्थेत आढळला. घटनास्थळी रेल्वे पोलिस
पो.ना. समाधान कंखरे, पो. शि. किशोर पाटील यांनी धाव घेत. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्या अनोळखी पुरुषाच्या मृत्यू झाला.
मृत अनोळखी पुरुषाचे वर्णन सदर पुरुषाचे अंदाजित वय ५०, उंची ५.५, रंग सावळा, बांधा सळपातळ, डोक्यावरील केस साधारण काळे, चेहरा लांब, नाक सरळ, डोळे काळे, मिशी बारीक वाढलेली, पोटावर पांढऱ्या रंगाचा चट्टा, गळ्यात पतरंगी दोरा, अंगावर फिकट व पिवळ्या रंगाचे शर्ट तपकिरी भुरसट रंगाची फुल पॅन्ट सदरील पुरुष अनोळखी असून ओळख पटविण्याचे आव्हान रेल्वे पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पो.ना.समाधान कंखरे करीत आहे.


