जळगाव: पोलीस आयुक्त ऑनलाईन– जिल्ह्यातील व इतर सर्व नवयुवक उमेदवार हे शासनाच्या सर्व भरतीची तयारी करीत असतात, परंतु शासनाच्या आवेदन शुल्काची फी ही वाढीव स्वरुपात वाढविल्याने त्यास नवयुवक बेरोजगार उमेदवारांचा विरोध आहे. सर्वच उमेदवार हे घरचे सरते- पुरते श्रीमंत नाहीत व सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. काहींचा परिवार हातमजुरीने चालत आहे व तरुण वर्ग देखील बेरोजगार आहे. त्यामुळे शासनाच्या ह्या वाढीव फी दुर्बल घटकातील उमेदवार नैराश्याने व नाईलाजाने इकडून तिकडून काहीही करुन पैसा जमा करून ही फी भरतो.. तरी सामान्य कुटूंबाचा व ह्यांचे आर्थिक परिस्थितीचा सारासार विचार करून शासनाने ही जी आवेदन शुल्काची वाढीव फी आहे ती कमी करुन मिळावी. यासाठी आज सर्व दुर्बल घटक तरुणांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी अजय निकाळजे, अजय सावळे, देविदास पाटील, तेजस्विनी तायडे, पूजा पाटील, आकांक्षा बाविस्कर, ममता चित्ते, रोशनी सावकारे, अर्चना लेहेरेकर, प्रीती पाटील, कल्याणी पाटील, रीना सपकाळे, ममता पावरा, नंदिनी साबळे, निकिता साबळे, प्रिया पाटोले, शुभांगी पाटील, करिष्मा अहिरे, कोमल पवार, महेश सगणे, तेजस धनगर, गणेश पाटील, अतुल पाटील, चेतन पाटील, श्रीकांत पाटील, निखिल पाटील, भूषण चव्हाण, गोपाल मानसिंग, दिव्या पाटील, वैशाली गायकवाड, भावना पाटील, पल्लवी चव्हाण, कृष्णा पाटील, महेंद्र जोशी, भूषण चव्हाण आदींसह नवयुवक बेरोजगार तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.