पुणे: दौंड- येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या चिठीच्या अनुषंगाने प्रथमदर्शी एकाने पत्नी व दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. पत्नी- पल्लवी-अतुल दिवेकर, वेदांतीका (मुलगी),अदत्विक (मुलगा) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर डॉ अतुल शिवाजी दिवेकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर येते. घटनास्थळी पोलीस अधिकारी व पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला आहे.

माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी अतुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
यावेळी पाहणीत घटनास्थळी चिठी सापडली. यामध्ये मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांचा खून केला. तर मी स्वतः आत्महत्या करीत असल्याचे नमूद होते.(During the inspection, a letter was found at the scene. In this, I strangled the wife and killed the two children by throwing them into the well. So it was mentioned that I myself was committing suicide)
त्यानुसार पोलिसांनी संबधीत विहिरीच्या ठिकाणी पाहणी केली. विहिरीतील पाणी जास्त असल्याने मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अतुल शिवाजी दिवेकर वरवंड येथील चैताली पार्क येथे कुटुंबासमवेत राहत होते. दुपारी बाजूच्या व्यक्तींनी घरात पाहणी केली असता त्यांना अतुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी खाली निपचीत पडल्याचे दिसून आले.(It was seen that the wife fell down in a state of hanging herself.)

