अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज ग्रंथालय सेलच्या राज्यस्तरीय शिबिरानिमित्त दौरा होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय व नाट्यगृहात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांची खिसे कापले. सुमारे 27 जणांचे खिशातील पाकिट तसेच 18 मोबाईलची चोरी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित भय्या खैरनार (शिरपूर), समीर शहा सलीम शहा (धुळे), अमितअली उमर (मालेगाव), उमर फारूक शेख (मालेगाव) यांना ताब्यात घेतले आहे.


