अमळनेर: पोलीस वृत्त- ऑनलाईन शहरातील दंगली प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी अशपाक शेख सलीम याच्या मृत्यूप्रकरणी अप्पर पोलीस महासंचालकांनी नाशिक सीआयडीला दिले आहेत. याबाबतचे पत्र जिल्हा पोलीस प्रशासनाला मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे.(It has been informed that the letter in this regard has been received by the district police administration.)
जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडे सीआयडी चौकशीसह पोलीस निरीक्षक व पोलीस सहकारी यांच्या निलंबनाची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक यांनी दि. १५ जूनला वरिष्ठांना पत्र पाठवून माहिती दिली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी १५ जूनच्या संध्याकाळी या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक यांना दिले आहे.(Superintendent of Police, State Crime Investigation Department, Nashik has been ordered to investigate the death case through CID.)
सदर प्रकरणी नाशिक सीआयडीने पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्याकडील आरोपींचे इनकवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट व इतर सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात करावी व सदरचा तपास हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे तसेच पोलीस महासंचालक यांच्या दिलेल्या सूचनांचे अंमलबजावणी करून पूर्तता करावी असे आदेश दिलेले आहे(.It has been ordered to implement and fulfill the instructions given by the Director General of Police.)


