अमळनेर दंगलीतील न्यायालयीन कोठडीत उपचार सुरू असलेल्या माजी नगरसेवक पुत्र अशपाक उर्फ पक्या सलीम शेख (वय-३३ रा. दर्गा अली मोहल्ला, अमळनेर) याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयित आरोपी अश्फाक शेख याच्या मृत्युची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक एम राजकुमार, पोलिस उपअधिक्षक संदीप गावीत, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, डीऐसबी पी आय रंगनाथ धारबडे, जिल्हापेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांनी रुग्णालयात धाव घेत माहिती घेतली.
मयताची शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे. तसेच या प्रकरणाची न्यायीक चौकशी करण्याची मागणी माजी उपमहापौर करीम सालार यांच्यासह मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.


