काल मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून एकाच दिवसात मान्सूनने केरळचा संपूर्ण भाग आणि तामिळनाडूचा जवळपास 30 टक्के भाग व्यापला आहे.
मान्सून दाखल झाल्यानंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुढील तीन दिवस राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
पुढील तीन दिवस राज्यातील मुंबईसह कोकण, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
तर याच काळात मराठवाडा विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.


