अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – एस एस सी बोर्डाचा मार्च 2023 चा निकाल यावर्षी कावपिंप्री विद्यालयातून एकूण 31 विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी सर्वच म्हणजे 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे निकाल 100% लागला. कावपिंप्री सह इंद्रापिंप्री, सुमठाणे येथील विद्यार्थी दरवर्षा प्रमाणे हयाही वर्षी मेहनत करून पास झाले. गेल्या तीस वर्षाचा इतिहास पहिला तर आपल्या विद्यालयातून अनेक शिलेदार तयार झाले. ते तयार झालेले शिलेदार निरनिराळ्या क्षेत्रात आज कार्यरत आहेत हे मला सांगायची गरज नाही. या सर्व फळाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. बापूसाहेब भैय्यासाहेब रामभाऊ पाटील यांना जाते. मुलींचे शिक्षण व्हावे या फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची संगत जोडून बापूंनी शाळा उभी केली आणि त्याची आज शिक्षण रुपी रसाळ फळे मिळू लागली. मागील निकाला प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा निकालात मुलींची बाजी आहे. यात कु. रुचिता चंद्रभान पाटील ( इंद्रापिंप्री ) 89.40 गुंणांनी प्रथम.
कु. धनश्री भाईदास पाटील ( सुमठाणे ) 88.80 गुंणांनी द्वितीय.
कु. शिवानी मनोज पवार ( कावपिंप्री ) 88.40 गुंणांनी तृतीय
असे अनुक्रमे यश मिळाले आहे.
. शाळेच्या गुणवत्ते बाबत मा. बापूसाहेब नेहमी चौकशी करतात. या कामी संस्थेचे सचिव मा. नानासाहेब मनोहर वल्लभराव पाटील आणि सर्व पालकांचा आम्हाला खूप सकारात्मक दिलासा असतो. म्हणून मुख्याध्यापक सह आम्ही सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आनंदी आणि उत्साही असतो.
. असो निकालाच्या निमित्ताने सहज लिहिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे विद्यालय कडून खूप खूप अभिनंदन.


